फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
Uncategorized

बनावट दाखले दिल्याप्रकरणी नवरदेवासह दोघांवर गुन्हे!

बनावट दाखले दिल्याप्रकरणी नवरदेवासह दोघांवर गुन्हे!

पिंपरी : शाळा सोडल्याचा बनावट दाखला व आधार कार्ड द्वारे फसवणूक करून लग्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे अलंकापुरी मंगल कार्यालयात 22 ऑक्टोबर 2025 रोजी हा प्रकार घडला. इंदापूर तालुक्यातील 48 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे

प्रमोद अभिमन्यू केकान आणि विशाल सुभाष डोईफोडे (दोघे रा. वाळुंज ,नंबर दोन, ता. इंदापूर, जिल्हा पुणे ) यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 10 व 11 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी प्रमोद केकान याने लग्नासाठी त्याचे वय अकरा वर्ष पूर्ण नसताना त्याचा शाळा सोडल्याचा दाखला व बनावट आधार कार्ड तयार करून वय 21 वर्षे पूर्ण असल्याचे भासवले. ते बनावट दाखले आळंदी येथील अलंकापुरी मंगल कार्यालयात देऊन फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्न केले यातून प्रमोद केकान आणि विशाल डोईफोडे यांनी फिर्यादी यांची मुलगी व मंगल कार्यालयाचे मालक कानिफनाथ राऊत यांची फसवणूक केली आहे.

viara vcc
viara vcc

गांजा विक्री प्रकरणी एका व्यक्तीस अटक
चाकण :अवैधरित्या 45 ,500 रुपये किमतीचा 932 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्री प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार 19 डिसेंबर रोजी दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास चाकण गावचे हद्दीत चक्रेश्वर मंदिराच्या कमानी जवळ असलेल्या पान टपरीच्या पाठीमागे घडली .

भैरोबा मनोहर यादव वय 42, पोलीस हवालदार, चाकण उत्तर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. वैभव संजय शिंदे (वय 19, रा. सदगुरू कॉम्प्लेक्स ,जय हिंद हॉस्पिटलच्या समोर चाकण, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैभव संजय शिंदे यांनी बेकायदेशीररित्या अमली पदार्थ गांजा विक्री करण्याकरता जवळ बाळगला. पोलिसांनी त्याची झडती घेतली त्यावेळी 45 हजार 500 रुपये किमतीचा 932 ग्रॅम वजनाचा गांजा आरोपींकडून जप्त करण्यात आला. पुढील तपास उत्तर चाकण पोलीस स्टेशन करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"