क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी,परंदवाल गर्ल्स,स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विजयी!

परंदवाल गर्ल्सच्या सुहानी कहांडळ हिने १०५ धावा करत ठोकले शतक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या,फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड करंडक १९ वर्षाखालील मुलींच्या २५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धांच्या चौथ्या दिवशी परंदवाल गर्ल्सच्या सुहानी कहांडळ हिने २१ चौकारासहित १०५ धावा उत्कृष्ट फलंदाजी करत शतक ठोकले तर दमदार फलंदाजी करूनही स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या समीक्षा पवारला शतकांने हुलकावणी दिली.क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी,परंदवाल गर्ल्स,स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला .फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे क्रिकेट स्पर्धां सुरू आहेत.
क्रिक बेसिक्स २ गडी राखून विजयी
1) एसजे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध क्रिक बेसिक्स यात झालेल्या सामन्यांमध्ये क्रिक बेसिक्स २ गडी राखून विजयी झाले. या सामन्यात ओवी काटे सामनावीर ठरली.
एस जे स्पोर्ट्स फाउंडेशन:२५ षटके 3 बाद १५१ धावा:-श्वेता जाधव १3,ऋतुजा देसाई 3७,भार्गवी करे १७,डिंपल तेजवानी 3४,ओवी काटे 3०/२,स्वरा आव्हाळे २२/१.
क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी २3.५ षटके ८ बाद १५२ धावा:- अर्णवी शिंदे 3९,श्रिया जगदाळे 3९, ओवी काटे १२,वामिका १८/१,अनन्या श्रीवास्तव २४/3,डिंपल तेजवानी १८/3.

परंदवाल गर्ल्स ९ गडी राखून विजयी
2) एस जे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध परंदवाल गर्ल्स यात झालेल्या सामन्यांमध्ये परंदवाल गर्ल्स ९ गडी राखून विजयी झाल्या. या सामन्यांमध्ये सुहानी कहांडळ सामनावीर ठरली या सामन्यांमध्ये सुहानी कहांडळ हिने २१ चौकारासहित १०५ धावा उत्कृष्ट फलंदाजी करत शतक ठोकले
एस जे स्पोर्ट्स फाउंडेशन २५ षटके ५ बाद १3८ धावा:- आर्या झेंडे २६,ऋतुजा देसाई ५२, मेघना मोळे १3/१, सुहानी कहांडळ १२/२, कुरियन इलाईन १२/१.
परंदवाल गर्ल्स १६ षटके १ बाद १४० धावा:-अनुष्का वाकोडे १ ० , सुहानी कहांडळ १०५,आर्या झेंडे १५/१.
स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ५८ धावांनी विजयी
3) स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध चंद्रस क्रिकेट अकॅडमी यात झालेल्या सामन्यांमध्ये स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी ५८ धावांनी विजयी झाली. या सामन्यांमध्ये समीक्षा पवार सामनावीर ठरली समीक्षा पवारने या सामन्यांमध्ये ९3 धावा केल्या शतकांने तिला हुलकावणी दिली.
स्कोर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी २५ षटके ६ बाद १८७ धावा:- समीक्षा पवार ९३, सानिका शिंदे १९, वैष्णवी सिंग २९/२,स्वस्ती काळभोर 3०/२,ईश्वरी नाईक ४३/१.
चंद्रस क्रिकेट अकॅडमी २५ षटके ७ बाद १२९ धावा:-साईश्री बनसोडे ११,प्रिया यादव २3,नीलू जायस्वार २२,अस्मिता शिंदे 3०/१,सानिका शिंदे ९/२,दीक्षा शेलार १६/१,आर्या चिखलीकर ७/२
पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय शिंदे यांच्या हस्ते क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमीच्या ओवी काटेला सामनावीरचे पारितोषक देण्यात आले. यावेळी सागर मोरे (प्रशिक्षक क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी) उपस्खित होते.