थेरगाव गुजर नगर येथे अनधिकृत बांधकामांवर हातोडा!

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई
पिंपरी : ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने थेरगाव येथील गुजर नगर येथे अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये १०८६ आणि २७८ असे एकूण सुमारे १३६४ चौरस फुट आरसीसी बांधकाम निष्कासित करण्यात आले.
निष्कासित करण्यात आलेल्या बांधकामांमध्ये १०८६ चौरस फुट क्षेत्रफळ असलेली पाच मजली आणि २७८ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली तीन मजली इमारतीचा समावेश आहे.
अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा दल, पोलीस दल, सुरक्षा कर्मचारी आणि मजुर उपस्थित होते.