स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच; न्यायालयाचा निर्णय!

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयामुळे मंगळवार दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानामुळे पुढे तीन आठवडे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची धाकधूक यामुळे वाढली आहे.

निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरुवातीला दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याची तयारी केली होती .मात्र न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने 24 नगरपरिषदा आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी होणारी निवडणूक 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली .या वीस डिसेंबरच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने घेण्याची सूचना केली होती .बुधवार तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी रोखण्याच्या न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी एकत्रित 21 डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरू झाल्या आहेत.
न्यायालयाने म्हटले आहे की ,दोन डिसेंबर रोजी मतदान झाले तरी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. तीन डिसेंबर रोजी मतमोजणी केल्यास त्याचा परिणाम 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो .त्यामुळे एकत्रितच मतमोजणी घेण्याच्या आदेश न्यायालयाने दिले आहेत.

