फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
गुन्हेगारी

बांधकाम कंपनीचा कंत्राटदाराला 86 लाखांना गंडा!

बांधकाम कंपनीचा कंत्राटदाराला 86 लाखांना गंडा!

पिंपरी : भोसरी बापूजी बुवा चौक ते पी एम टी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युत विषयक कामाची वर्क ऑर्डर एका बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधीने विद्युत कामाचे बिल फिर्यादीला न देता 86 लाखाहून अधिक रक्कम न देता आर्थिक फसवणूक केल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एका पन्नास वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे .

viara vcc
viara vcc

त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधीने विद्युत कामाचे बिल कंपनीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर कंत्राटदाराला उर्वरित 86 लाखाहून अधिक रक्कम न देता त्याची फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीला भोसरी बापूजी बुवा चौक ते पीएमटी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युत विषय कामाची वर्क ऑर्डर दिली होती. फिर्यादीने हे काम वेळेत पूर्ण केले आणि पिंपरी चिंचवड पालिकेने ही पूर्णत्वाचा दाखला दिला.

फिर्यादीने केलेल्या कामाच्या खर्चाची बिले महापालिकेत जमा केली. या बिलाची रक्कम एक कोटी 99 लाख 93 हजार 145 रुपये ही बांधकाम कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली. परंतु कंपनीने फिर्यादीला केवळ 63 लाख 12 हजार 423 रुपये देऊन त्याची उर्वरित 86 लाख 44 हजार 219 रुपये रक्कम दिली नाही. फिर्यादीने आरोपीकडे उर्वरित रकमेबाबत विचारणा केली असता आरोपीने तू जीएसटी वेळेवर भरला नाहीस, मी तुझी रक्कम तुला देणार नाही, तुला काय करायचे ते कर माझी कुठेही तक्रार कर, मी कोणाला घाबरत नाही अशी धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"