फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

सुविधांबाबत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

सुविधांबाबत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन शहरातील नागरिकांना सेवा, सुविधांबाबत उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत असून आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई केली जाईल असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

बुधवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रतिनिधींची बैठक आयुक्तांसमवेत आयुक्तांच्या दालनात झाली. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अंतर्गत शहरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर जनसंपर्क मोहीम राबवून नागरी समस्या जाणून घेतल्या होत्या. याबाबत एक विस्तृत निवेदन मागील १५ दिवसांपूर्वी आयुक्तांना देण्यात आले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत बुधवारी बैठक घेतली होती.

काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा सुविधा, पाणीपुरवठा, मेट्रो, सार्वजनिक आरोग्य, अल्पसंख्याक समाजासाठी स्मशानभूमी, वाहतूक, अरुंद रस्ते, अतिक्रमण झालेले पदपथ, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, विद्युत व उद्यान विभाग विषयी तक्रारी आयुक्तांपुढे मांडल्या. तसेच मनपाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित करावी. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती करावी. शहराचा चौफेर विस्तार होत असताना वाढत्या शहरीकरणामध्ये मध्ये ख्रिश्चन व मुस्लिम समाजाला आवश्यक प्रमाणात स्मशानभूमी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

वैद्यकीय सेवा प्रभावीपणे राबवून कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी चालना देऊन जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती करावी. म्हाडा कॉलनी, देहू – आळंदी बीआरटी रोड, त्रिवेणी नगर परिसरातील दूषित पाणीपुरवठा बाबत प्रत्यक्ष पाहणी करावी. पिंपरी स्टेशन जवळील उद्यानाचे आरक्षण विकसित करावे, पिंपरी कॅम्प परिसर व गावठाणातील वाहतूक समस्यावर निर्णायक तोडगा काढावा. मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पिंपरी, दापोडी, कासारवाडी नदीकिनारी सीमाभिंत उभारावी. शहरातील गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्यामुळे कृपया वैद्यकीय सेवा नागरिकांना व्यवस्थित मिळणे करिता आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. तसेच वैद्यकीय सेवेसाठी हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महिला काँगेस माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, वाहब शेख, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, डॉ. मनिषा गरुड, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, ॲड. अशोक धायगुडे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, बाबासाहेब बनसोडे, केनिथ रेमी, सचिन कोंढरे पाटील, अर्चना राऊत, स्मिता पवार-मुलाणी, निर्मला खैरे, अबूबकर लांडगे, सतीश भोसले, वसंत वावरे, रवींद्र कांबळे, चंद्रशेखर जाधव, शहर सचिव ॲड. मोहन अडसूळ, योगेश बहिरट, दीपक भंडारी, अरुणा वानखेडे, कुंदन कसबे, राजन नायर, अज्जू जॉन, बाबा आलम शेख, सुरज कोथिंबीरे, तारीक रिजवी, माजिद अली, महानंदा कसबे आदींसह शहर काँग्रेस मधील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या समस्या मांडण्यात आल्या..
पाणी पुरवठा सुरळीत व्हावा.
रस्त्यांवरील अतिरिक्त कचऱ्याचे नियोजन हवे.
भटक्या कुत्र्‍यांचा बंदोबस्त करा.
रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवा.
पार्किंग समस्येवर उपाययोजना करा.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"