फक्त मुद्द्याचं!

1st April 2026
आरोग्य

पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीची माहिती
पिंपरी : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व आस्थापनांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही माहिती आयुक्तांनी घेतली.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे; उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे,तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. अभय दादेवर; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे; सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, सुनील भागवानी, अजय सूर्यवंशी, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता म्हणून चंद्रकांत मुठाळ, सुनील नरोटे, सतीश वाघमारे, हेमंत देसाई, पी. बी. लांडे, संतोष दुर्वे, महेश कावळे, योगेश आलाट, विजयसिंह भोसले, विजय जाधव, गणेश राऊत , सहायक आयुक्त अमित पंडित, किरणकुमार मोरे, परशुराम वाघमोडे, राजीव घुले; क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, अतुल पाटील, राजाराम सलगर, किशोर ननवरे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे तसेच सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, योगेश फल्ले, राजेश भाट, अतुल सोनवणे, महेश आढाव, अंकुश झिटे, शांताराम माने आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरात पाणी साचू नये आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करावी. स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना, प्लास्टिक वापरावर कडक कारवाई आणि तीव्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीमध्ये महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४,९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली. ३० मार्चपर्यंत ती २२.६७% पर्यंत पोहोचली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रगती पाहता ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने ३२.२२% प्रगती साधत आघाडी घेतली आहे. ‘अ’ (२८.२८%) आणि ‘ई’ (२५.६३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही चांगली कामगिरी केली असून ‘ब’ (२४.६७%) आणि ‘ग’ (२४.३३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही स्पर्धात्मक वेग दाखवला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"