फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथील विविध प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथील विविध प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मोशी येथे कार्यान्वित असलेल्या विविध प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.कैलास शिंदे व शहर अभियंता श्री. शिरिष आरदवाड यांनी भेट दिली. सदर भेटीदरम्यान वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच हॉटेल वेस्ट टू बायोगॅस व राडारोडा व्यवस्थापन केंद्राच्या तांत्रिक बाबींसह प्रकल्प उभारताना येणाऱ्या आव्हानांबाबत त्यांनी इतंभूत माहिती घेतली.

पिंपरी चिंचवड शहरात निर्माण होणाऱ्या एकुण घनकचऱ्यावर तसेच बांधकाम राडारोड्यावर मनपा मार्फत करणेत येणाऱ्या संकलन व प्रक्रिये बाबत श्री.संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी उपस्थितांना सादरीकरणासह विस्तृत माहिती दिली. आयुक्त,कैलास शिंदे यांनी प्रकल्प यशस्वीरित्या उभारुन कार्यान्वित ठेवले बाबत पिंपरी चिंचवड मनपाचे अभिनंदन केले. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत शहरात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्यावर महानगरपालिकेमार्फत करणेत येणाऱ्या शाश्वत व पर्यावरणपुरक प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती घेतली, त्यानुसार सदरचे प्रकल्प पर्यावरणपुरक व स्टेट ऑफ दि आर्ट संकल्पनेवर आधारित असून सर्व आव्हानांचा सामना करुन पूर्ण करुन पूर्ण केले असले बाबत मनपाचे कौतुक केले. सदर स्थळ पहाणीवेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री.शिरिष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार, उप अभियंता श्री.जितेंद्र रावळ तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे उप अभियंता श्री. योगेश आल्हाट उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"