फक्त मुद्द्याचं!

18th March 2026
पिंपरी-चिंचवड

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली मुख्य प्रशासकीय भवनातील विभागांची सखोल पाहणी!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली मुख्य प्रशासकीय भवनातील विभागांची सखोल पाहणी!

कार्यालयीन शिस्त, विभागातील स्वच्छता आणि पारदर्शक कामकाजावर भर देण्याच्या दिल्या सूचना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील विविध विभागांना भेट देत कामकाजाची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

viara vcc
viara vcc

या पाहणी दरम्यान त्यांचे समवेत उप संचालक किशोर गोखले,सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता सुनील भागवानी, बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उप आयुक्त राजेश आगळे, सचिन पवार, चेतना केरुरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रत्येक विभागातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित विषय, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी व त्यावर करण्यात येणारी कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कामातील अडचणी, आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा यांचा आढावा घेतला. प्रशासनातील कामकाज अधिक सुटसुटीत आणि गतिमान करण्यासाठी विभागीय पातळीवर समन्वय वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी विभागांची अंतर्गत रचना, बैठक व्यवस्था आणि कार्यालयीन परिसराची स्वच्छता यावर विशेष भर दिला. कार्यालयीन जागा अधिक सुव्यवस्थित, स्वच्छ आणि कामकाजास पूरक राहील, यासाठी जुन्या फाईल्स व अनावश्यक कागदपत्रांचे गट्ठे तत्काळ हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक वापर करून कागदविरहित कामकाज वाढविण्यावर भर दिला.

कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्यपरिसर निर्माण करणे तसेच नागरिकांना कार्यालयात येताना सुलभ आणि विश्वासार्ह सेवा अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय कार्यालयीन वातावरण सुधारल्यास कामकाजाची गुणवत्ता वाढते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या समाधानावर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिस्तबद्ध आणि वेळेवर कामकाज होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच, पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा सर्व विभागांची पाहणी करून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याबाबत खातरजमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पाहणीनंतर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांची देखील पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"