चिंचवड विधानसभा शिवसेना उबाठा प्रमुख अनंता कोऱ्हाळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात!

पिंपरी : चिंचवड विधानसभेतील, चिंचवड प्रभागातील शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांनी आज पुणे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कार्यलायात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजिददादा पवार यांच्या उपस्थितीत तसेच विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्यात आला.

या पक्षप्रवेशावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते अनंता कोऱ्हाळे हे लढवय्या कार्यकर्ते असुन त्यांच्या पक्षप्रवेशाने नक्कीच चिंचवड विधानसभा मतदार संघात तसेच शहरात पक्ष वाढीस मदत होईल असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी नाना काटे यांनी बोलताना सागितले की अजितदादांच्या काम करण्याच्या संकल्पनेतुन येत्या काळात शहरात व चिंचवड विधानसभेत असे अनेक पक्ष प्रवेश होतील.

