फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक

निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी: शिस्तबद्ध पद्धतीने केलेले काम, आपसातला समन्वय ठेवून जबाबदारीने पार पाडलेले काम तसेच प्रत्येकाने निवडणूक कामकाजासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचे नियोजन आणि व्यवस्थापनाचा उत्तम नमुना दिसून आला. सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी तसेच नागरिकांचेही चांगल्या पद्धतीचे सहकार्य लाभले. पवार म्हणाले की, निवडणुकीचे काम संवेदनशील असते, याची जाणीव ठेवून दिलेली जबाबदारी अचूकपणे आणि पारदर्शक वातावरणात सर्वांच्या सहकार्याने पार पाडली. हे कामकाज उत्तम समन्वयामुळे शक्य असून सर्वांनी दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. वेळी म्हणाले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना या मतदारसंघासाठी नियुक्त केलेली पोलिस यंत्रणा, वैद्यकीय पथक तसेच इतर अनुषंगिक यंत्रणांनी देखील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान चांगले सहकार्य केले. निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू, निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.

मतमोजणी कक्षात पार पडलेल्या या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन समन्वय अधिकारी शिरीष पोरेडी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वय अधिकारी बापूसाहेब गायकवाड, मनुष्यबळ व्यवस्थापन किरण कुमार मोरे, सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे, समन्वय अधिकारी उमेश ढाकणे, टपाली मतदान समन्वय अधिकारी अमित पंडित, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय मेटाप्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी राजेंद्र डुंबरे, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान कक्ष समन्वय अधिकारी अनिता कोटलवार, निवडणूक सहाय्यक श्वेता आल्हाट, नीलिमा थेऊरकर यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"