फक्त मुद्द्याचं!

11th April 2026
पिंपरी-चिंचवड

मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन सक्तीच्या रजेवर!

मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन सक्तीच्या रजेवर!

मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बोगस उपसूचना मंजूर करून तब्बल 52 कोटीहून अधिकची बिले ठेकेदारांना देताना भ्रष्टाचार झाल्याचा संशय मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांच्यावर असल्याने याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्य चौकशी समिती नेमली आहे. या समितीने आठ दिवसात आपला अहवाल सादर करायचा आहे. चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२०२६ चे सुधारित व सन २०२६-२०२७ चे मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ,घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य, वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबींचा विचार करता, चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच चौकशी प्रक्रियेत कोणताही प्रभाव पडू नये व कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"