फक्त मुद्द्याचं!

19th February 2026
पिंपरी-चिंचवड

शिवजयंती निमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल!

शिवजयंती निमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल!

पिंपरी :शिवजयंतीनिमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते रात्री 11 या कालावधीत हा बदल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत.

viara vcc
viara vcc

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक हिंजवडी या मार्गावर मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार असून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत .कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या मार्गावरून मारुंजी वाय जंक्शन येथून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदी वस्ती, इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.

मेझा 9 चौकाकडून हिंजवडी गावकडे जाणारी वाहतूक ही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. शिवाजी चौकाकडून यु टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक मार्गे, हिंजवडी गावठाण कडे जाणारी वाहतूक जांभुळकर जिम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदी वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा 9 चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील. शिवजयंती निमित्त हिंजवडीतील वाहतुकीत बदल

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"