फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

देहूरोड निगडी परिसरातील वाहतुकीत 25 डिसेंबर रोजी बदल!

देहूरोड निगडी परिसरातील वाहतुकीत 25 डिसेंबर रोजी बदल!

गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना ; 71 वा वर्धापन दिन
 पिंपरी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (म्यानमार) येथून आणलेली गौतम बुद्धाची मूर्ती देहूरोड येथील बुद्ध विहारात स्थापन केली होती. या ऐतिहासिक घटनेचा 71 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 25 रोजी साजरा होत असून यानिमित्ताने देहूरोड बुद्ध विहार येथे मोठ्या प्रमाणावर भाविक व अनुयायी येण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देहूरोड निगडी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

viara vcc
viara vcc

 त्यानुसार काही प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी ठेवून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहतुकीतील हे बदल बुधवार 25 डिसेंबर पहाटे ते रात्री बारापर्यंत लागू राहणार आहेत. बुद्ध विहारात दर्शनासाठी येणारे अनुयायी तसेच पोलीस अग्निशामक दल, रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवातील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले आहे. जुना मुंबई पुणे महामार्गावर सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती चौक यादरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. या मार्गावरील वाहने सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून बेंगळूर महामार्गाने मुकाई चौक मार्गे इच्छित स्थळी जावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

 तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौक ते सेंट्रल चौक या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांसाठी भक्ती शक्ती सर्कल वरून डावीकडे वळून अप्पूघर कॉर्नर, बिग इंडिया चौक ,धर्मराज चौक. हँगिंग ब्रिज मार्गे किंवा अप्पूघर कॉर्नर येथून नव्या पुलावरून मुकाई चौक मार्गे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"