फक्त मुद्द्याचं!

10th February 2026
पिंपरी-चिंचवड

पोलीस भरतीसाठी भोसरीतील वाहतुकीत बदल!

पोलीस भरतीसाठी भोसरीतील वाहतुकीत बदल!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या अनुषंगाने इंद्रायणी नगर भोसरी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. इंदिरानगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे पोलीस भरतीची शारीरिक चाचणी 10 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या परिसरात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.

viara vcc
viara vcc

भोसरी इंदिरानगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूल गेट नंबर दोन दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनांसाठी दोन पर्याय मार्ग आहेत. पहिला म्हणजे भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण मार्गे इंद्रायणी नगर स्वीट कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ सीबीएसई स्कूल गेट नंबर दोन येथे उजव्या बाजूने वळून इंद्रायणी नगर पोलीस वसाहत पिंपरी मार्गे जाईल.

दुसरा पर्याय मार्ग भोसरी इंद्रायणी नगर स्वीट कॉर्नर चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण या मार्गे तिरुपती (सहारा) चौकाकडे जाणारी वाहतूक महादेव मंदिर येथून डाव्या बाजूला वळून रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्ट मार्गे जाता येईल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"