फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
पिंपरी-चिंचवड

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार बारणे यांच्या विरोधात खटला!

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार बारणे यांच्या विरोधात खटला!

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी मावळ विशेष न्यायालयात खटला चालवला जाणार आहे .श्रीरंग बारणे यांनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देण्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती .

viara vcc
viara vcc

बारणे यांनी 2009 आणि 2019 च्या निवडणूक दरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणून-बुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2019 च्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास अशी नमूद केली होती ,तर 2009 मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण सण 1989 असे लिहिले होते. याशिवाय त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी चिंचवड न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. शपथपत्रातील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणाविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेऊन न्यायालयाने याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले .

पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉक्टर हरिदास यांनी युक्तीवाद केला. या निष्कर्षाच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 125 अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्या विरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत..

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"