चिखली विकास आराखड्यातील रस्त्याची व आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिर संपन्न!

पिंपरी : चिखली गावठाण मधील म.न.पा. शाळा मुले व मुली या ठिकाणी मौजे चिखली भागातील विकास आराखड्यातील रस्त्याची व आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते.
गेले दोन दिवस जमीन मालक/ विकसक जागा ताब्यात देणेसाठी उपस्थित होते व नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याचे संपादनात येत असल्याची खात्री झालेनंतर कागदपत्रे प्रत्यक्ष
सादर करुन जागेचा आगाऊ ताबा दिला व महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे ‘अ’ व ‘ब’ प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले. दोन दिवसाचे शिबीरामध्ये रस्ते व आरक्षण यांचे एकूण ८०,६१८.०० चौ.मी. इतके क्षेत्र टी.डी.आर./ एफ.एस.आय.चे बदल्यात ताब्यात आले आहे. उर्वरित क्षेत्र ही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी जमीन मालकांनी दर्शविली आहे. काही कागदपत्रांची पूर्तता झालेनंतर उर्वरित जमीनी महानगरपालिकेच्या ताब्यात मिळणार आहेत.
या दोन दिवसाचे शिबीराचे आयोजन मा. आयुक्त श्री. शेखर सिंह यांचे मार्गदर्शनाखाली केले होते.त्यामध्ये खालील अधिकारी, कर्मचारी यांनी काम पाहिले. उपसंचालक, नगररचना- प्रसाद गायकवाड, सहाय्यक संचालक, नगररचना- संदेश खडतरे , उपअभियंता- अशोक कुटे व श्री. विकास घारे , कनिष्ठ अभियंता- श्रीम. वृशाली पाटील, रुकुपचंद देशमाने, अनिल इदे, सच्चिदानंद महाजन व संदीप वाडीले, सर्व्हेअर- परशुराम बनपट्टे व घनश्याम गवळी यांचा समावेश आहे.