सी .पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ!

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सी.पी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला आहे .आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवून ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला .राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली तर रेडी यांना 300 मते मिळाली. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली धनकड यांनी सी .पी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.

