सीताबाई गायकवाड यांचे निधन

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बीव्हीजी इंडिया लि. चे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड व डॉ दत्तात्रय गायकवाड यांच्या मातोश्री श्रीमती सीताबाई रामदास गायकवाड (वय- ७० वर्षे) यांचे निधन झाले.
श्रीमती सीताबाई गायकवाड यांनी पुणे महापालिका शिक्षण मंडळामध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले होते. पती निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचे पालन पोषण करुन त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. थोरले चिरंजीव हणमंतराव यांना इंजिनिअर आणि धाकटे चिरंजीव दत्तात्रय यांना डॉक्टर बनविले. सेवा निवृत्ती नंतर त्यांनी राज्यात विविध ठिकाणी बीव्हीजीच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
पिंपळे गुरव परिसरात सांप्रदायिक क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेऊन महिला भजनी मंडळ व विविध सुधारणांचे उपक्रम राबविले. नुकतच त्यांनी सांगवी परिसरातील भाविकांना नव्याने उभारलेल्या अयोद्धेतील प्रभू श्रीराम मंदिराची स्वखर्चाने तीर्थयात्रा घडवली होती. हणमंतराव नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेच्या अमूल्य योगदानास देत असतात.