फक्त मुद्द्याचं!

27th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारा!

पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारा!

अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या संख्येने भटका गोवंश फिरताना दिसतो. अनेकदा या मुक्या जनावरांची हेळसांड होते. अन्न पाण्याविना या जनावरांना फिरावे लागते. अनेक वेळा प्लास्टिक खाऊन त्यांचे आरोग्य खराब होते. याच्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे रात्री अपरात्री कसाई या गोवंशाची चोरी करतात. निर्जन भागात जाऊन या गोवंशाची कत्तल केली जाते. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन तातडीने शहरातील भटक्या गोवंशासाठी गोशाळा उभारली जावी. त्यामध्ये त्यांना निवारा आणि चारा मिळावा, अशी मागणी अखिल भारत कृषी गो सेवा संघाने भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली आहे.

अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे कुणाल साठे, निलेश चायकर, अभिजीत चव्हाण, ऋषी चावरे, पूजा जाधव यांनी याबाबत महेश लांडगे यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडच्या परिसरामध्ये जो पूर्वीचा ग्रामीण भाग आहे. त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येमध्ये भटका गोवंश आपल्याला दिसतो आणि या गोवंशाची अत्यंत हेळसांड झालेली आहे. आपण गोमातेला देवता मानतो. आपली संस्कृती गोआधारित संस्कृती आहे. परंतु, या भटक्या गोवंशाची अनेकदा उपासमार होत असते आणि प्लास्टिक खाऊन त्यांचे आरोग्य खराब होते.

viarasmall
viarasmall

गो सेवा संघाचे कुणाल साठे म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या पूर्वीच्या ग्रामीण भागामध्ये हजारोंच्या संख्येने गोवंश आढळतो ज्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही. याबाबतीत महाराष्ट्र शासनाला योग्य निर्णय घ्यायला भाग पाडण्याची मागणी आमदार लांडगे यांच्याकडे केली. हा गोवंश वाचला पाहिजे. जपला पाहिजे याच्या करता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतंत्र गोशाळा निर्माण करावी. हा परिसर धार्मिक वैभव असलेला भाग आहे. आळंदी, देहू, चिंचवड ही पवित्र स्थाने आहेत. या ठिकाणी गोशाळेची स्थापना झाली, तर या धार्मिक वैभवात भर पडेल आणि त्याचबरोबर रस्त्यावरच्या वाहतुकीला मोकाट जनावरांमुळेच उपद्रव होतो तो संपूर्णपणे नाहीसा होईल . तसेच, आपल्या हिंदू संस्कृतीचे रक्षण होऊन त्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"