फक्त मुद्द्याचं!

9th June 2026
गुन्हेगारी

सख्या भावाने आपल्या भावाचे पेटविले घर: आरोपी अटकेत

सख्या भावाने आपल्या भावाचे पेटविले घर: आरोपी अटकेत

पिंपरी : वडगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या दिवाणी दाव्याच्या कारणावरून सख्या भावाने आपल्या भावाच्या घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून घराला आग लावली. ही घटना रविवार 7 जून रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास सदुंबरे ता. मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी संदीप अनंता गाडे (वय 41, रा सुदुंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेश अनंता गाडे (वय 42, रा. महाळुंगे, सी. 16/19 ,सेक्टर 2, द्वारका सिटी ,महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात वडगाव न्यायालयात प्रलंबित सुरू असलेले दिवाणी दाव्याच्या कारणावरून रविवार दिनांक सात जून रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून घरास आग लावली. फिर्यादी घरातून किचनची खिडकी तोडून बाहेर आल्याने फिर्यादीचा जीव वाचला. या आगीमध्ये फिर्यादी यांचे घराचा मेन दरवाजा, सोपासेट व लाकडी कपाट घरातील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग असे एकूण 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रेळेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"