फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

बिरला समुहाच्या इंद्रिया ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन पिंपरीत

बिरला समुहाच्या इंद्रिया ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन पिंपरीत

पिंपरी : आदित्य बिरला समुहाच्या इंद्रिया या ज्वेलरी ब्रँडचे दुसरे दालन सिटी वन मॉल, पिंपरी येथे सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी
अनंतनारायणन हरिहरन – हेड मर्चेंडाइजिंग अँड रिटेल, इंद्रिया (आदित्य बिर्ला ग्रुपचा भाग), आणि अमित धारप – रिटेल प्रमुख, इंद्रिया यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नवीन दालनाच्या निमित्ताने या समुहाने भक्कम ब्रँड इक्विटी व बाजारपेठेच्या सखोल अभ्यासासह आपला कन्झ्युमर पोर्टफोलिओ अधिक बळकट केला आहे. प्रेमाने घडविलेल्या प्रत्येक दागिन्यातून भारतीय कारागिरीची उत्कृष्टता दिसून येते आणि सोने, पोलकी व हिऱ्याच्या दागिन्यांची तब्बल १६,००० हून अधिक डिझाइन्स या ठिकाणी उपलब्ध आहे.

इंद्रियासाठी या शहराच्या निमित्ताने देशातील एक अत्यंत आश्वासक भागातील चौखंदळ व वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाशी जोडण्याची असामान्य संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ,परंपरा व आधुनिकता यांचा मिलाफ पुण्यात आढळतो. पुण्याचा समृद्ध वारसा आणि तरुण व डायनामिक लोकसंख्येमुळे पुणे ही डिझाइन व इनोव्हेशनची मागणी असलेल्या ग्राहकांशी जोडण्यासाठी इंद्रियाचा विस्तार करण्यासाठी एक रोमांचक जागा आहे.

पुढील पाच वर्षांत भारतातील आघाडीच्या तीन ज्वेलरी रिटेलर्समध्ये स्थान प्राप्त करण्याच्या उद्दिष्टाने आदित्य बिरला समुहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिरला यांनी जुलै महिन्यात इंद्रिया लाँच केले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला तब्बल रु.५,००० कोटींच्या अभूतपूर्व गुंतवणुकीचे पाठबळ लाभले आहे. यातून भारतातील ज्वेलरी रिटेल क्षेत्रात क्रांती घडविण्याचा आदित्य बिरला समुहाचा निर्धार स्पष्ट होतो.

या लाँचवर प्रतिक्रिया देताना इंद्रियाचे संचालक दिलीप गौर म्हणाले, “इंद्रियाच्या माध्यमातून ज्वेलरी क्षेत्रातील कल्पकता, व्याप्ती, तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभवातील मापदंडांची पुनर्व्याख्या करण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येक दागिन्यामागे कारागिरीची एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते, या समजूतीवर हा ब्रँड आधारलेला आहे. एकमेवाद्वितीय उत्पादन, असामान्य ग्राहक अनुभव आणि परस्परसंवादी खरेदीचा प्रवास यामुळे ज्वेलरीच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त होण्याचे साधन उपलब्ध होते. आमच्या उत्पादनात चिरंतन कारागिरीची सांगड घालण्यात आली आहे आणि त्याच वेळी समकालीन डिझाइनचा नव्याने विचार करण्यात आला आहे. आमची प्रादेशिक निवड वेगवेगळ्या परंपरांचा आदर करते आणि इतर संस्कृतींनाही त्यांचा आनंद घेण्याची संधी देते.”
इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, “आमचे मूल्य वेगळेपण, खास डिझाइन्स, वैयक्तिक सेवा आणि प्रादेशिक वैशिष्ट्यांवर आधारित आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"