भोसरी विधानसभा निवडणूक ; आमदार महेश लांडगे यांना नोटीस!

लांडगे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादींमध्ये घोटाळा झाल्याने कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. आय .छागला यांनी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांना नोटीस काढून 15 एप्रिल पर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आपल्या बाजूने सकारात्मक वातावरण असताना महेश लांडगे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. लांडगे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे अॅडव्होकेट असीम सरोदे ,अॅडव्होकेट श्रीया आवळे ,अॅडव्होकेट राजाभाऊ चौधरी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

एकच नावाच्या ,वय , घरचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान आय कार्ड देणे ,सारखीच नावे, वय, सारख्या मोबाईल नंबर असलेल्या अनेक लोकांना मतदार म्हणून नोंदवून घेणे ,अशी 62000 बोगस मतदारांची नोंदणी नावे भोसरीतील मतदार संघात समाविष्ट आहेत .अशी लेखी तक्रार मतदार यादी नक्की करण्याच्या आधीच दिली होती. पण याची दखल सुतराम घेतली नाही असा गव्हाणे यांचा आरोप आहे .विधानसभा निवडणुकीत खरा भ्रष्टाचार मतदार याद्यांसह ईव्हीएम द्वारे भाजप आणि महायुतीच्या मतदार केंद्रित मतदार संघात व्यापक प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केला आहे