फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

संभाजी महाराज पुतळा प्रकरणी आंदोलन

संभाजी महाराज पुतळा प्रकरणी आंदोलन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या ९ सप्टेंबर रोजी ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामात प्रचंड अनागोंदी होत असल्याची माहिती नुकतीच महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांनी उघडकीस आणली . पुतळा उभारणीचे काम प्राथमिक अवस्थेत असताना संभाजी महाराजांच्या ‘मोजडी’ला तडे गेले आहेत. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी रोष व्यक्त केला आहे . या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. यामुळे शहराच्या लौकिकाला देखील तडा गेला आहे.

अशा प्रकारचा सत्ताधाऱ्यांचा मस्तवाल कारभार थांबवण्यासाठी आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली जाईल. पिंपरी चौकातून राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन देखील करणार असल्याचे मानव कांबळे यांनी सांगितले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिक तसेच शिव-शंभू प्रेमी संघटनांनी सहभागी व्हावे असे देखील आ

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"