फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : विधानसभा अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. नार्वेकर यांची यामध्ये एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले आहेत. तसेच पुन्हा एकदा या पदावर विराजमान झाल्याबद्दल नार्वेकर यांचे कौतुक केले आहे.

नार्वेकर यांच्यासारखा निष्णात वकील या पदाच्या खुर्चीवर बसला आहे त्यामुळे न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून होईल, यात शंका नाही. ४० ते ५० वर्षे जुने असलेल्या सभागृहात नार्वेकर यांनी अनेक बदल घडवून आणले, असे फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांचे दालन हे सर्व पक्षांसाठी हक्काचे दालन असते. सभागृहात विविध गोष्टींवरून वाद होत असतात. तरीही सगळेजण हक्काने अध्यक्षांकडे जातात. यापूर्वीही नार्वेकर यांच्याकडे सर्वपक्षीय सदस्य सतत जात असत. त्यांच्या दालनातून वाद संपुष्टात येत असत. त्यामुळे यावेळीही ही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्याच्या हितासाठी काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"