फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
अध्यात्म

नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन रद्द

नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन रद्द

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहू, प्रतिनिधी : राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या गुंत्यात नाव येत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ केलेले वक्तव्य महंत नामदेवशास्त्री यांना जड जाण्याची शक्यता आहे. समाज माध्यमांवर हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विषयी नाराजी पसरली आहे. या सगळ्याचा विचार करता भंडारा डोंगर ट्रस्टने नामदेवशास्त्री महाराज यांचे सात फेब्रुवारीचे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भाघ शुद्ध दशमी निमित्त सात दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यभरातील कीर्तनकार आपली कीर्तनसेवा सादर करत असतात. नामदेवशास्त्री यांचे कीर्तन येत्या सात फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे. मात्र, वादग्रस्त विषयावर त्यांनी टिप्पण्णी करीत धनंजय मुंडे यांचे समर्थन केल्यामुळे त्यांच्या विषयी रोष उत्पन्न झाला आहे. याचा विचार करून नामदेवशास्त्री यांच्याशी विचारविनिमय करून भंडारा डोंगर ट्रस्टने त्यांचे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी ही माहिती दिली.

ट्रस्टला तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नामदेव महाराज यांच्या कीर्तनास मराठा समाजाकडून तीव्र विरोध होऊ शकतो. कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी, आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ट्रस्टने याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे सुचविण्यात आले होते.
धार्मिक प्रवचनकारांनी जाती-पातीच्या राजकारणापासून दूर राहावे, असे आवाहन अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. संभाव्य तणाव टळला असला तरी या घटनेचे रडसाद पुढील काळा उमटण्याची शक्यता आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"