महिला टी २० साठी संघ जाहीर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बीसीसीआयने महिला टी २० वर्ल्ड कप २०२५साठी महिला संघाची घोषणा केली आहे. १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. हरमनप्रीत कौर ही संघाची कर्णधार असून स्मृती मंधाना ही उपकर्णधार असेल.
वर्ल्डकपसाठी असा असेल भारतीय महिला संघ – हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव यांचा समावेश आहे.