बारणे क्रिकेट अकॅडमीला “टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद!

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन आयोजित ; बारणे क्रिकेट अकॅडमीचा हर्षल हाडके सामनावीर
पिंपरी : स्पर्धेतील अंतिम फेरीत बारणे क्रिकेट अकॅडमी व शिळीमकर स्पोर्ट्स क्लब या संघामध्ये झाली. या सामन्यात बारणे क्रिकेट अकॅडमीने शिळीमकर स्पोर्ट्स क्लबचा १५१ धावांनी पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.या सामन्यांमध्ये हर्षल हाडके याने सुंदर फलंदाजी करत शतक झळकावले. या सामन्यात हर्षल हाडके, बारणे क्रिकेट अकॅडमी सामनावीर ठरला

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी फेज-3 येथे चालू असलेली “पिंपरी-चिंचवड क्रिकेट करंडक” मर्यादित २० षटकांची खुल्या गटाची आंतर क्रिकेट क्लब स्पर्धासंपन्न झाली. या स्पर्धेचे अंतिम धावफलक खालील प्रमाणे आहेत
बारणे क्रिकेट अकॅडमी २१४ धावा ६ बाद २० षटके:-वेदांत हंचे २९,हर्षल हाडके ११४,ऋषी बारणे ३६,सागर नाईक २६/३ .
शिळीमकर स्पोर्ट्स क्लब ६३ धावा सर्व बाद १२.४ षटके:- विशाल गव्हाणे १५, सागर जाधव २०, पृथ्वी सिंग १३/२, संभाजी शिंदे २६/३, अमन बिरादार १२/४.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी परंदवाल क्रिकेट अकॅडमी व एसजेएसएफ रेड यांची लढत झाली. या सामन्यात परंदवाल क्रिकेट अकॅडमी अकॅडमीने एसजेएसएफ रेड यांचा १२६ धावांनी पराभव करून या स्पर्धेतील तिसरा क्रमांक पटकाविला. एसजेएसएफ रेड संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या सामन्यात मनोज चौधरी, परंदवाल क्रिकेट अकॅडमी सामनावीर ठरला
परंदवाल क्रिकेट अकॅडमी २०१धावा ४ बाद २० षटके:- प्रसन्न मोरे ४४, अखिलेश पाटील ३३, स्नेहल खामणकर ७८, हिरा चौधरी १९, मनोज चौधरी १८, वैभव जाधव २६/२.
एसजेएसएफ रेड ७५ धावा सर्व बाद १८.२ षटके:- आरुष्य सिंग २९, कुंदन कुमार १४/३, मनोज चौधरी १५/३. मनोज चौधरी, परंदवाल क्रिकेट अकॅडमी

