बजाज ऑटो ब्ल्यू संघाला प्रथम महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद!

प्रथम महिला क्रिकेट स्पर्धा ; प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडला उपविजेते पद
पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या वर्षी पहिली औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धा बजाज ऑटो आकुर्डीच्या क्रीडांगणावर संपन्न झाली. औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासामधे प्रथमच ही स्पर्धा बाद पद्धतीने मर्यादित ६ षटकांची घेण्यात आली. अंतिम सामन्यांमध्ये प्राज इंडस्ट्रीज विरुद्ध बजाज ऑटो ब्ल्यू या संघामध्ये झालेल्या समन्यात बजाज ऑटो ब्ल्यू संघाने विजेतेपद मिळवले

दोन दिवसाच्या या स्पर्धेत बजाज ऑटो ग्रीन,बजाज ऑटो ब्ल्यू, जेसीबी, प्राज इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एमक्युअर, थरमॅक्स, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, फॉरविया फोरेशिया, एयुओ मोबिलिटी व स्पार्क मिंडा या कंपन्यांच्या महिला संघांनी आपला सहभाग नोंदविला .
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संतोष सोनटक्के (एचआर हेड साऊथ एशिया मार्केटिंग टेट्रापॅक),बजाज ऑटोचे एडमिन व स्पोर्ट्स मॅनेजर अतुल काळोखे,प्राज इंडस्ट्रीजचे व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद बावा,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदमयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष सोनटक्के म्हणाले की ,औद्योगिक क्रीडा इतिहासामध्ये पहिल्यांदाच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली..अशा स्पर्धा नियमित व्हाव्यात यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील.
यावेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर,संतोष सोनटक्के (एचआर हेड साऊथ एशिया मार्केटिंग टेट्रापॅक),प्राज इंडस्ट्रीज व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद बावा, एमक्युअर एचआर मॅनेजर झुबीन,स्पर्धा प्रमुख हरी शपांडे,सहखजिनदार विजय हिंगे,जेसीबी एचआर मॅनेजर दयानंद नरवडे,जेसीबी स्पोर्ट्स कमिटीचे सचिन कांबळे,प्राज इंडस्ट्रीज स्पोर्ट्स कमिटीचे राहुल कापसे,महिंद्रा अँड महिंद्रा स्पोर्ट्स कमिटीचे श्रीनिवास मोरे, दिनेश भुजबळ,आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम,मंदार कुलकर्णी,ज्येष्ठ खेळाडू रियाज उतावळे उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन खजिनदार प्रदीप वाघ यांनी तर आभारप्रदर्शन स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे यांनी केले.स्पर्धेसाठी YouTube प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी खेळाडूंनी अशा स्पर्धा आम्हास नेहमी खेळण्यास मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत स्पर्धा आयोजकांचे आभार मानले.
अंतिम सामना धावफलक :-
अंतिम सामन्यांमध्ये प्राज इंडस्ट्रीज विरुद्ध बजाज ऑटो ब्ल्यू या संघामध्ये झालेल्या बजाज ऑटो ब्ल्यू संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले तर प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
बजाज ऑटो ब्ल्यू ; ६ षटके, १ बाद ७० धावा :- अस्मिता मोरे २७,स्नेहा नाईक २९.
प्राज इंडस्ट्रीज ; ६ षटके, ३ बाद ४६ धावा:-रश्मी देशमुख २०,मिता पडनाद १२,स्नेहा नाईक ५/२,आकांक्षा दरगर ८/१.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज अस्मिता मोरे (बजाज ऑटो ब्ल्यू), उत्कृष्ट गोलंदाज मिता पडनाद (प्राज इंडस्ट्रीज) तर स्नेहा नाईक (बजाज ऑटो ब्ल्यू) ठरल्या.

