फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना!

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना!

महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्घाटन
पिंपळे गुरव,: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’च्या महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात आणि जनतेच्या साक्षीने पार पडले. हे कार्यालय आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू करण्यात आले असून, राज्यात या प्रकारचे हे पहिलेच कार्यालय आहे.

ncp ajitdada
ncp ajitdada

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आले आहे, जे त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाला समर्पित असणारी ही अविस्मरणीय भेट ठरली आहे.

कार्यक्रमात आमदार शंकर जगताप म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिले आयुष्मान भारत योजनेचे कार्यालय आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सामान्य माणसाला सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनेचा व्यापक लाभ होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुष्मान भारत योजनेचे मार्गदर्शक यांचे यासाठी विशेष आभार मानतो.”

डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, “उपचार किंवा पैशाअभावी महाराष्ट्रातील एकही रुग्ण दगावणार नाही, असं संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आरोग्य हक्क म्हणून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. शंकर जगताप यांच्या पुढाकारामुळे या भागातील नागरिकांना आता अधिक जवळून आणि तत्पर सेवा मिळणार आहे. हे कार्यालय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल.”

उपचारांचे दर नव्याने निश्चित होणार
कोणत्याही रुग्णालयाने उपचारा करू नये त्यासाठी उपचारांच्या पॅकेजचे दर नव्याने निश्चित करण्याचे काम सुरू असून १५ ऑगस्टपर्यंत ते जाहीर होतील. त्यामुळे रुग्णालयांकडूनही या योजनेला मोठे सहकार्य मिळेल, असे डॉ. शेटे यांनी सांगितले

या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. येमपल्ली, डॉ. शेलार, आयुष्मान भारत शहराध्यक्ष गोपाळ माळेकर, माजी महापौर उषाताई ढोरे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सुरेश भोईर, शारदा सोनवणे, उषा मुंडे, सविता खुळे, सागर आंगोळकर, शशिकांत कदम, राजेंद्र गावडे, संतोष कांबळे, महेश जगताप, हर्षद नढे, विनोद तापकीर, संजय जगताप, नरेश जगताप, शशिकांत दुधारे, सखाराम रेडेकर, शेखर चिंचवडे, राहुल जवळकर, कुंदाताई भिसे, अमृता नवले, रेखा दूधभाते, कविता दळवी, प्रीती कामतीकर, पल्लवी मारकड, रमेश काशीद, पाटीलबुवा चिंचवडे, अमर अदियाल, दीपक काशीद, रमेश काळे यांचा समावेश होता.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"