पुणे जिल्ह्यात सरासरी ६१.०५ टक्के मतदान

पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सरासरी ६१.०५ टक्के मतदान (Pune Voting Turnout) झाले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७६.१० टक्के तर सर्वात कमी मतदान हडपसर मतदारसंघात ५०.११ टक्के झाले आहे. शहरी भागात ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह जास्त दिसून आला. त्यामुळे मतदानाची अधिकृत अंतिम आकडेवारी आज (गुरुवारी) दुपारी उपलब्ध होईल, असे जिल्हा निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले.जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
जुन्नर – ६८.४४
आंबेगाव – ७०.०१
खेड आळंदी – ६७.७०
शिरूर – ६८.५०
दौंड – ७३.२७
इंदापूर – ७६.१०
बारामती – ७१.०३
पुरंदर – ६०.०२
भोर – ६८.०१
मावळ – ७२.१०
चिंचवड – ५८.७३
पिंपरी – ५१.२९
भोसरी – ६१.१४
वडगाव शेरी – ५५.७१
शिवाजीनगर – ५०.९०
कोथरूड – ५२.१८
खडकवासला – ५६.५३
पर्वती – ५५.२६
हडपसर – ५०.११
पुणे कॅन्टोन्मेंट – ५२.८५
कसबा पेठ – ५८.७६

