फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

स्वयंचलित तंत्रज्ञान करणार रस्त्यांचे सर्वेक्षण

स्वयंचलित तंत्रज्ञान करणार रस्त्यांचे सर्वेक्षण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम सुरू करणार आहे. हा अभिनव उपक्रम रस्त्यांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, खड्डे असलेले परिसर ओळखण्यासाठी आणि रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) एकत्रित केलेली रस्त्यांची माहिती महापालिकेच्या भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) प्लॅटफॉर्ममध्ये संकलित केली जाईल. या माहितीद्वारे सततची होणारी खड्डे दुरुस्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून शहराच्या रस्त्यांची एकूण गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात साधारण १ हजार ७०० किलोमीटर लांबीचे क्रॉक्रीट व डांबरी रस्ते आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष तपासणी आणि संरचनात्मक मूल्यांकनांद्वारे (स्ट्रक्चरल असेसमेंट) खड्डे दुरूस्ती कामांच्या गुणवत्ता वाढीला प्राधान्य दिले जाणार आहे. रस्ते दुरुस्ती आणि सुधारणांसाठी तसेच महापालिकेच्या अंदाजपत्रकाचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये पहिला अहवाल सादर करण्यात येणार असून तीन वर्षांसाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम रहिवाशांना सुस्थितीत आणि सुरक्षित रस्ते प्रदान करण्याच्या महापालिकेच्या वचनबद्धतेमधील एक महत्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान (ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी) आणि जीआयएस प्रणालीच्या आधारे रस्त्यांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यास तसेच अंदाजपत्रकातील नियोजन आणि रस्ते बांधणीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळणार आहे. सर्वेक्षणानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि देखभालीसाठी कंत्राटदार व संबंधित अधिकारी या दोघांनाही जबाबदार धरले जाणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"