सोन्याचे ब्रेसलेट भासवून रक्कम लाटण्याचा प्रयत्न; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा!

यापूर्वी 4 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक
पिंपरी : बनावट सोने खरे असल्याचे भासूवून दोघा तरुणांनी खोट्या सोन्याचे 52.270 ग्रॅम वजनाच्या तीन चैन ज्वेलर्स कडे घाण ठेवून यापूर्वी 4 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पुन्हा त्याच तरुणांनी त्याच ज्वेलर्सकडे सोन्याचे ब्रेसलेट खरे असल्याचे भासवून विक्री करण्यासाठी येऊन पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिद्धनाथ ज्वेलर्स महात्मा फुले चौक, चाकण येथे घडली.

यापूर्वी त्यांनी 17 जुलै ते 9 सप्टेंबर या कालावधीत फसवणूक केली होती. याप्रकरणी विकासनाथा भारते (वय 45, रा. फ्लॅट नंबर ए -205 , ग्रीन इस्टेट, रोहकल रोड, चाकण उत्तर, ता. खेड, मूळ- रा. भुडता, खानापूर, जि. सांगली) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजीत बंडू गदळे (वय 22, रा. कुबेर पार्क, वाडेगाव रोड, केसनंद, ता. हवेली, मूळ – रा. दहिफळ, ता. केज, जि बीड), समीर सुरेश माने (वय 33, रा. अनंता टॉवर बिल्डिंग नंबर 24, फ्लॅट नंबर 1403, उलवे ,नवी मुंबई, मूळ- रा. हुतात्मा चौक शेजारी, वडूजता, खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी बनावट सोने खरे भासवून फिर्यादीचे सिद्धनाथ ज्वेलर्स (चाकण) येथे खोटे सोन्याचे एकूण 52.270 ग्रॅम वजनाच्या तीन चैन फिर्यादीचे कडे गहाण ठेवून 4 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केली. आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीकडे बनावट सोन्याचे ब्रेसलेट खरे असल्याचे भासवून ते विक्री करण्याच्या बदल्यात रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बंडेपो, पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे तपास करत आहेत.

