ॲटलास कॉपको कंपनीच्या आंतरविभागीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न!

पिंपरी :ॲटलास कॉपको कंपनीच्या आंतरविभागीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या .ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही खेळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. बुद्धिबळ स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी तर कॅरम स्पर्धेमध्ये १२२ खेळाडूंनी भाग घेतला.

या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१)बुद्धिबळ स्पर्धा (पुरुष गट)
प्रथम क्रमांक ..ऋत्विक महाशेवडे ,६ गुण , द्वितीय क्रमांक.. नचिकेत पाटील, ५ गुण , तृतीय क्रमांक.. हेमंत पांढरपट्टे ५ गुण
२)बुद्धिबळ स्पर्धा (महिला गट )
प्रथम क्रमांक.. पायल गुप्ता ४ गुण ,द्वितीय क्रमांक.. दिव्या सबनीस ३ गुण ,तृतीय क्रमांक.. शची जोशी २ गुण ,२) कॅरम स्पर्धा पुरुष (एकेरी गट )
प्रथम क्रमांक.. महेश साबळे ,द्वितीय क्रमांक ..वैभव काळे ,तृतीय क्रमांक.. विशाल ससाने
३) कॅरम स्पर्धा महिला (एकेरी गट)
प्रथम क्रमांक.. सुषमा सिंग ,द्वितीय क्रमांक.. अनुप्रिया पोडीला, तृतीय क्रमांक.. अमरीन शेख , ४) कॅरम मिश्र (दुहेरी गट )
प्रथम क्रमांक.. तिरूमला राव आणि अनुप्रिया पोडीला,द्वितीय क्रमांक.. अमित घार्गे आणि प्रीती कांबळे ,तृतीय क्रमांक.. समीर साळवे आणि तेजश्री कांबळे
या स्पर्धेचे पारितोषक वितरण ॲटलास कॉपको स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी दयानंद प्रक्षाळें, खजिनदार संदीप काळे, उपाध्यक्ष तुषार थोरात यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास स्पोर्ट्स कमिटीचे तानाजी कवठेकर, संग्राम जगताप उपस्थित होते .पारितोषक वितरणचे वेळी दयानंद प्रक्षाळे म्हणाले की या स्पर्धांना खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. खेळामधील सहभाग हा आपल्या दैनंदिन कामातील तणाव नष्ट करतो .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील ब्राह्मणकर यांनी केले.