ॲटलास कॉपको एम्प्लॉइज स्पोर्ट्स क्लबचा ५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

पिंपरी : ॲटलास कॉपको एम्प्लॉइज स्पोर्ट्स क्लबला ५० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित ५० वा वर्धापन दिन सर्व कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या क्लबची स्थापना १० जानेवारी १९७५ रोजी कामगारांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने करण्यात आली होती

वर्धापनदिनानिमित्त क्लबचे अध्यक्ष व जनरल मॅनेजर अमरदीप सिसोदिया यांनी सर्व कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.क्लबचे सचिव दयानंद प्रक्षाळे यांनी क्लबच्या पुढील वाटचालीची माहिती दिली.यावेळी स्पोर्ट्स क्लब च्या कार्यासाठी आपले योगदान देणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.या क्लबद्वारे सादर करण्यात येणाऱ्या ,वर्षभर चालणाऱ्या स्पर्धेत ( पहिल्या वर्षी एक खेळाची स्पर्धा होती आता एकूण १३ खेळाच्या स्पर्धा होतात) जवळ जवळ १६०० कर्मचारी उत्साहाने सामील होत असतात.या प्रसंगी केलेल्या भाषणात अमरदीप सिसोदिया यानी या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक व सलग ३ वर्षे स्वीडिश चॅम्पियन शिप मिळविल्याबद्दल सर्व संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.
क्लबद्वारे सर्व कर्मचाऱ्यांसाठी वर्षा सहली,विविध खेळ आयोजित करण्यात येतात व पारितोषिक देण्यात येतात.तसेच औद्योगिक क्रीडा संघटनेच्या सिंहगड चढणेची स्पर्धा ही पुरस्कृत करण्यात येते.
या कार्यक्रमास मुकेश लालचंदाणी( जनरल मॅनेजर, गेसिया), शची जोशी (सीएफओ, फुल टाइम डायरेक्टर), सुनील कटारे (जनरल मॅनेजर, सी पी एस पंप), किरण पांचाळ (जनरल मॅनेजर ,सी टी पी सी, तळेगांव) ,शशिकांत पलांडे ( ॲटलास कोपको युनियन अध्यक्ष), गणेश गवारे (युनियन जनरल सेक्रेटरी) इरफान खान (क्रीडा समन्वयक) तसेच स्पोर्ट्स कमिटी सदस्य तुषार थोरात ,संग्राम जगताप, तानाजी कवठेकर हेही उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप काळे आणि अमित रैना यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन स्वप्निल ब्राह्मणकर यांनी केले.