फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

मिलिटरी हद्दीतील १८ मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु!

मिलिटरी हद्दीतील १८ मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु!

 प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी;मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या तक्रारीची दखल
 पिंपरी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिलिटरी हद्दीतील १८ मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु झाल्याने परिसरातील कुणाल आयकॅान, एस ३ लाईफ स्टाईल, शुभश्री वुड्स, रोझवुड, रिदम, प्राईम प्लस, रोझ व्हॅली, पीस व्हॅली, समृध्दी पार्क, रोझ काऊटी, अल्कोव, साई पर्ल आदी सोसायटी मधील नागरिकांची रस्त्याची समस्या सुटली आहे.

viara vcc
viara vcc

मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उपमुख्यंमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार यांच्या समवेत काही दिवसापुर्वी जनसंवाद यात्रेनिमित्त आपल्या प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी प्रभागातील १८ मीटर मिलेटरी रस्त्याची पाहणी केली होती, हा रस्ता ८० टक्के पुर्ण झाले आसुन काही ठिकाणी या रस्त्यावर थोड्या प्रमाणात रस्त्याचे काम आपुर्ण आहे व वारंवार पाठपुरावा करून देखील काम होत नाही अशी तक्रकर केली होती.

या रस्त्याचा वापर करताना परिसरातील कुणाल आयकॅान, एस ३ लाईफ स्टाईल, शुभश्री वुड्स, रोझवुड, रिदम, प्राईम प्लस, रोझ व्हॅली, पीस व्हॅली, समृध्दी पार्क, रोझ काऊटी, अल्कोव, साई पर्ल आदी सोसायटी मधील नागरिकांना अनेक समस्या ना सामोरे जावे लागत होते ही बाब नाना काटे यांनी माननीय अजितदादा यांच्या निर्दशनास आणुन दिली होती त्याचवेळी जाग्यावर अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्त श्री श्रवण हार्डिकर यांना त्वरीत या रस्त्याचे समस्या दुर करून काम पुर्ण करण्यास सागितले होते त्यानुसार आज या रस्त्याचा डांबरीकरणाचा कामास सुरूवात करण्यात आली. अजितदादा व नाना काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेचे परिसरातील सोसायटी मधील नागरिकांनी स्वागत केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"