पूररेषेतील बांधकामांचा अहवाल द्या

पिंपरी : पवना नदीच्या पुररेषेत नियमबाह्य पध्दतीने बांधकाम विकासकाने उभारलेल्या गृहप्रकल्पांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करुन तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र पाठवून टपाली अहवाल मागितला आहे.
महापालिका बांधकाम अधिकारी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांनी आर्थिक संगणमताने कागदपत्रात फेरफार करत नियमबाह्य इमारत बांधण्यास मदत केलेली आहे. पवना नदीची पुररेषा बदलून इतरत्र हस्तांतरित केल्याचा अहवाल कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला यांनी महापालिकेकडे दिला. त्यानंतर महापालिकेकडून कोणतीही खातरजमा न करता नदी पात्रात पुररेषेत कल्पतरु कन्स्ट्रक्शन यांना त्या जागेवर बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच संबंधित बांधकामास भोगवटा प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. . पवना नदीच्या पुररेषेत नियमबाह्य पध्दतीने बांधकाम विकासकाने उभारलेल्या गृहप्रकल्पांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करुन तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहेत.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ११ सप्टेंबर २०२४ रोजी पत्र पाठवून टपाली अहवाल मागितला आहे. तसेच नगरविकास प्रधान सचिव, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे, उपसंचालक, नगररचना विकास, महापालिका यांनाही पत्र देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पिंपळे गुरव येथील पवना नदीच्या पूररेषेत स. नं. २५/१अ/१, ८५/१ब/२/१, १९/१ब, ८६/२ब/१ या जागेवर बांधकाम विकासकाने अवैध पध्दतीने निवासी बांधकाम केले आहे. पर्यावरणीय नियमाचे उल्लंघन करत महापालिका बांधकाम विभागाने ८ अ, ८ ब, ८ क अशा तीन इमारती पुर रेषेत ( ब्लू लाईन) उभ्या करण्यास बांधकाम परवानगी दिलेली आहे.
या गृहप्रकल्पात सुमारे ७० ते ८० फ्लॅट असून एक फ्लॅट अंदाजे एक ते सव्वा कोटी रुपयांना विक्री केला आहे. महापालिका बांधकाम अधिकारी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांनी आर्थिक संगणमताने कागदपत्रात फेरफार करत नियमबाह्य इमारत बांधण्यास मदत केलेली आहे. पवना नदीची पुररेषा बदलून इतरत्र हस्तांतरित केल्याचा अहवाल कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, खडकवासला यांनी महापालिकेकडे दिला. त्यानंतर महापालिकेकडून कोणतीही खातरजमा न करता नदी पात्रात पुररेषेत कल्पतरु कन्स्ट्रक्शन यांना त्या जागेवर बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच संबंधित बांधकामास भोगवटा प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे माजी नगरसेविका उषा मुंडे आणि अतुल काशीद यांनी तक्रार केली आहे. पवना नदीपात्रात कल्पतरु कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम विकसकाने नियमबाह्य केलेल्या बांधकामावर आणि संबंधित नियमबाह्य कामे करण्यास मदत करणा-या अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.