शहरात स्वच्छता सेवा पंधरवडा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘स्वच्छता ही सेवा२०२४’ अंतर्गत शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी सात ते १० या वेळेत सी सर्कल, स्पाईन रोड, भोसरी येथे ‘स्वच्छ सांस्कृतिक उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सावाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या सांस्कृतिक उत्सवात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे उपस्थित राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांसह शहरातील पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थितीही राहणार आहे.