फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

भाजपाला आणखी एका मित्र पक्षाने सोडले

भाजपाला आणखी एका मित्र पक्षाने सोडले

नवी दिल्ली : भाजप कायम मित्रपक्षाला दगा देत आलीय हे आता नित्याचेच झाले आहे. राज्यसभेत कायम भाजपला साथ देणाऱ्या भाजपने लोकसभा निवडणूकीआधी ओडीशात बिजू जनता दलात देखील फोडाफोडी केली. त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या तब्येतीविषयी अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या. त्याचा बिजू जनता दलाला फटका बसला व ओडीशात भाजपची सत्ता आली. तेव्हापासून बिजू जनता दलाने भाजपसोबत फारकत घेतली असून राज्यसभेत इंडिया आघाडीच्या खासदारांसोबत बिजू जनता दलाच्या नऊ खासदारांनी देखील सभात्याग केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"