हुंड्यासाठी पुण्यात आणखी एका सुनेची आत्महत्या!

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे .स्नेहा विशाल झंडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे . पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी स्नेहा हिने आत्महत्या केली .राहत्या घरात गळफास घेऊन आपला जीव संपवला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

स्नेहाच्या नातेवाईकांनी सासरच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत .याप्रकरणी कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .तक्रारीत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा यांचे विशाल झंडगे यांच्याशी गेल्या वर्षी लग्न झालं आहे. ते दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहायला होते. लग्न झाल्यानंतर स्नेहा हिचा तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेक वेळा वाद होत होते.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्नेहाला स्वयंपाक नीट करता येत नाही ,तिने वीस लाख रुपये घेऊन यावे, तसेच इतर कारणांसाठी सासरच्या मंडळीकडून अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, आणि स्नेहाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे . याप्रकरणी स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासू विठाबाई झेंडगे ,दीर विनायक झंडगे ,नणंद तेजश्री थिटे, नंदे चा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.