जिल्हा ओपन कॅरम स्पर्धेत अनिल मुंडे यांनी मिळविला प्रथम क्रमांक!

उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमी व साई विरंगुळा केंद्र संभाजीनगर आकुर्डी , यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत
पिंपरी : उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमी व साई विरंगुळा केंद्र संभाजीनगर आकुर्डी , यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा ओपन कॅरम स्पर्धा 24, 25 ऑगस्ट रोजी साई विरंगुळा केंद्र येथे आयोजित करण्यात आल्या. अनिल मुंडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी महापौर सौ मंगलाताई कदम यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी त्यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन व विजेत्यांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेच्या उद्घाटन कुशाग्र दादा कदम (अध्यक्ष) कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन, मंदार कुलकर्णी उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमी (अध्यक्ष),राज कदम .( युवा नेते ) यांनी केले, संतोष वऱ्हाडी, नंदकुमार (भाई )साने, पंकज कुलकर्णी, अविनाश कदम, मुरलीधर तातेवार, प्रसाद( बापू ) भागवत, अप्पा बारटक्के, निलेश काळे, विनोद देसाई, शशिकांत रहाटे, सनी कतनोरिया व पीटर पिल्ले (पीटर पिल्ले कॅरम अकॅडमी ) आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीश नागुल यांनी केले.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून एकूण 128 खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत श्री शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी ही भाग घेतला. प्रमुख पंच श्री रामांजनेयुलू पडगिल( आंतरराष्ट्रीय पंच ),सहायक पंच संतोष सरावदे व रोहित कदम यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील पहिला ब्रेक टू फिनिश सागर झिटे यांनी नोंदविला. स्पर्धेमध्ये चार ब्रेकफिनिश आणि एक ब्लॅक टू फिनिश नोंदवण्यात आले.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक -11000/- अनिल मुंडे ,द्वितीय क्रमांक-7000 रहीम खान , तृतीय क्रमांक–5000/ सागर वाघमारे , ,,चतुर्थ क्रमांक-4000/ चांद शेख ,,पाचवा क्रमांक-2000/, सहावा क्रमांक-2000/ अभिजीत त्रीपणकर सहावा क्रमांक-2000/ इक्बाल कुरेशी, सातवा क्रमांक-2000/- योगेश परदेशी, आठवा क्रमांक-2000/- नौशाद शहा, नऊ ते 16 क्रमांक – 1000/-, प्रत्येकी यामध्ये हरून शेख, अथर्व तेलंगी, सचिन बांदल, वासिम शेख, वासिम खान, अनुराग दुबाळे, अनंत भूते, निकुल काकडे या विजेत्यांचा समावेश आहे. , ब्रेक टू फिनिश आणि प्रत्येक ब्लॅक टू फिनिश साठी प्रत्येकी 250 रुपये या प्रमाणे पारितोषक देण्यात आली.