फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

पूजा करण्यासाठी गेलेले तिघे इंद्रायणीत बुडाले

पूजा करण्यासाठी गेलेले तिघे इंद्रायणीत बुडाले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मोशी परीसातील एका आश्रमात शिकणारे विद्यार्थी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी घाटावर गेले असताना तिघेजण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) घडली. त्यातील एकाला तात्काळ बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

जय ओमप्रकाश दायमा (वय १९, रा. वनी, नाशिक), ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय १६, रा. पद्मावती गल्ली, लातूर) आणि प्रणव रमाकांत पोतदार (वय १७, रा. खर्डा आष्टी, बीड) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. त्यातील ओंकार याचा मृतदेह सोमवारी सापडला. तर प्रणव याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोशी परिसरात वैदिक विद्यालय येथे शिकणारे ७१ विद्यार्थी श्रावणी उपाकर्मकरीता सोमवारी सकाळी इंद्रायणी नदी मोशी येथे आले होते. त्यातील एकजण पूजा करताना इंद्रायणी नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी ओमकार, प्रणव आणि त्यांचे तीन मित्र गेले. मात्र पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवताना जय, ओमकार आणि प्रणव हे पाण्यात बुडाले. इतर दोघेजण वाचले.

जय याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांचा नदीत शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास बुडालेल्या दोघांपैकी ओमकार याच मृतदेह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाला आढळला. सोमवारी प्रणव पोतदार याचा मृतदेह सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता एनडीआरएफच्या पथकाला प्रणव याचा मृतदेह सापडला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"