Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

कंपनी संचालकाच्या सारखी दिसणाऱ्या व्यक्तीने तीस लाखाची केली फसवणूक!

कंपनी संचालकाच्या सारखी दिसणाऱ्या व्यक्तीने तीस लाखाची केली फसवणूक!

पिंपरी : कंपनीचे संचालक संजय पणवर यांच्या आयडी सारखी दिसणाऱ्या दुसऱ्या संजय पनवर या आयडी धारकाने कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून कंपनीच्या अकाउंटंटला मेसेज करून तीस लाख रुपये पाठविण्यास सांगितले. जी एन एस इंजीनियरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक ऑफ बडोदा अकाउंट मधून तीस लाख रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास जी एन एस इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टेल्को रोड, बालाजी नगर, भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी गजेंद्र भारत भोरे (वय 32, रा. जयहिंद विहार कॉलनी, माने स्कूल शेजारी, भारत माता चौक, काळेवाडी, मुळगाव- मु. पो. श्रीनिवास सरडगी, ता.जि. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजय पनवर आयडी धारक या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी एन एस इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टेल्को रोड येथे फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर संजय पणवर यांच्या आयडी सारखी दिसणाऱ्या संजय पणवर या आयडीधारकाने फिर्यादीच्या कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करून आयसीआयसीआय बँक खातेधारक MAA DAKHINAKALI ENTERPRISES अकाउंट नंबर आयएफएससी कोड नंबर असा मेसेज करून अकाउंटला तात्काळ 30 लाख रुपये पाठवण्यास सांगून जी एन एस इंजीनियरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक ऑफ बडोदा अकाउंट मधून 30 लाख रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक खडसे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"