जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालय विजयी!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बॉल बॅडमिंटन स्पर्धा ही अमृता विद्यालय यमुनानगर निगडी येथील शाळेच्या मैदानावर संपन्न होत आहेत. आज झालेल्या उद्घाटनाच्या वेळी प्राचार्य स्वामिनी पवना अमृता चैतन्य तसेच उपमुख्याध्यापिका अमृता चैतन्य तसेच क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे सर तसेच क्रीडा शिक्षक शेखर कुलकर्णी प्रास्ताविक केले . स्पर्धेचे कामकाज हनुमंत सुतार, शिवाजी मुटकुळे,अजित मुंडे, यांनी केले.पंच म्हणून प्रसाद हरपळे सर व नितेश गुप्ता सर यांनी जबाबदारी पार पाडली तर हनुमंत सुतार यांनी सूत्रसंचालन केले

14 वर्ष मुले अंतिम निकाल
प्रथम क्रमांक
अमृता विद्यालय विजयी विरुद्ध सेंट उर्सुला हायस्कूल निगडी- गुण (35-32), (35-30)
तृतीय क्रमांक
सिटी इंटरनॅशनल स्कूल विजयी विरुद्ध *मातृ विद्यालय चिंचवड- गुण (35 – 19),(35 16)
14 वर्षे मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक
अमृता विद्यालय निगडी विजय विरुद्ध सेंट उर्सला हायस्कूल निगडी गुण (35 – 30), (35 – 32)
तृतीय क्रमांक
मातृ विद्यालय चिंचवड विजयी विरुद्ध अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (गुण – (35 – 19) (35 -16)
विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
17 वर्ष मुली अंतिम निकाल
प्रथम क्रमांक
अमृता विद्यालय निगडी विजयविरुद्ध *सेंट उर्सला हायस्कूल गुण (35 -32) (35 -25)
तृतीय क्रमांक
सिटी इंटरनॅशनल स्कूल विजय विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल देहू रोड- गुण (35 – 30) (35 – 32)
17 वर्षे मुले अंतिम निकाल
प्रथम क्रमांक
अमृता विद्यालय निगडी* विजयविरुद्ध सेंट उर्सला हायस्कूल आकुर्डी – गुण (35- 32) (33- 35) (35- 33)
तृतीय क्रमांक
मातृ विद्यालय चिंचवड विजयी विरुद्ध सिटी इंटरनॅशनल स्कूल -गुण (35- 28) (35- 33)