औद्योगिक क्रीडा संघटनेच्या फुटबॉल स्पर्धेत अम्युनेशन फॅक्टरी विजयी!

“सिग्मा इलेक्ट्रिकल मॅन्युफॅकचरिंग” आयोजित फुटबॉल स्पर्धा
पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी “सिग्मा इलेक्ट्रिकल मॅन्युफॅकचरिंग” यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत टाटा मोटर्सच्या फुटबॉल क्रीडांगणावर अंतिम सामन्यात अम्युनेशन फॅक्टरीने ॲटलास कॉपको संघावर ५ विरुद्ध ४ गोलने टाईब्रेकर मध्ये विजय नोंदविला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण विजय खंदाडे (जनरल मॅनेजर सप्लाय चेन, सिग्मा इलेक्ट्रिक), सुयोग फुलबडवे( एचआर मॅनेजर, सिग्मा इलेक्ट्रिक) यांच्या हस्ते पार पडले.

अंतिम फेरीमध्ये अम्युनेशन फॅक्टरी, विजयी
अम्युनेशन फॅक्टरी विरुद्ध ॲटलास कॉपको या दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगला. अम्युनेशन फॅक्टरीमध्येच्या संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा तर ॲटलास कॉपकोच्या संघामध्ये तरुण खेळाडूंचा भरणा होता. अनुभव विरुद्ध तारुण्य हा सामना चांगलाच रंगला परंतु शेवटी अनुभवाने तारुण्यावर मात केली व अम्युनेशन फॅक्टरी ५ विरुद्ध ४ गोलने टाईब्रेकर मध्ये जिंकली.अम्युनिशन फॅक्टरी संघाने यावर्षी विजेत्या करंडकावर आपले नाव कोरले.ॲटलास कॉपको कडून उत्कर्ष नरुले,ऋषिकेश पाटील, राहुल करोडी यांनी तर अम्युनेशन फॅक्टरी कडून नोयेल फर्नांडिस, सुकांता मधु, आशिष गलांडे, जीवन लावंड यांनी गोल केले.
या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स ए, टाटा मोटर्स बी, बजाज ऑटो वाळूज,एसकेएफ,ॲटलास कॉपको, टीटीआयएल, सँडविक एशिया, थरमॅक्स, अम्युनिशन फॅक्टरी, फॉर्विया, टीकेआयएल वगैरे ११ कंपन्यांच्या संघानी भाग घेतला .
औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचे, विजय खंदाडे (जनरल मॅनेजर सप्लाय चेन सिग्मा इलेक्ट्रिक), सुयोग फुलबडवे( एचआर मॅनेजर सिग्मा इलेक्ट्रिक) यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सचिव वसंत ठोंबरे, अभिषेक नायर (एचआर मॅनेजर, टाटा मोटर्स), नितीन कदम(टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी) स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, दयानंद प्रक्षाले (ॲटलास कॉपको स्पोर्ट्स कमिटी ) यांच्या हस्ते करण्यात आले
.या प्रसंगी.विजेते व उपविजेत्या संघाना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, , ,सहखाजिनदार विजय हिंगे,, उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमीचे मंदार कुलकर्णी, ज्येष्ठ खेळाडू सुदर्शन आहेर, नाडर, आर्यन ट्रॉफीचे अमित कदम, विजय सुतार,अशोक पाटील हेही उपस्थित होते.या स्पर्धेचे आयोजनासाठी सायमन डिगामा, नरेश जाधव, नरी जगन्नाथन, अरुल फर्नांडिस यांनी रेफ्री म्हणून काम पाहिले. सदर स्पर्धा सिग्मा इलेक्ट्रिकल मॅन्युफॅकचरिंग यांनी आयोजित केली आहे.या कार्यक्रमाचे संचालन प्रदीप वाघ यांनी , प्रास्ताविक वसंत ठोंबरे, आभार प्रदर्शन हरी देशपांडे यांनी केले.
अंतीम सामन्यापूर्वी झालेल्या उपांत्य टाटा मोटर्स बीचा ॲटलास कॉपको संघाने टाय ब्रेकर मध्ये ६- ५ पराभव करुन अंतीम फेरी घठली. दुसर्या उपांत्य सामन्यात अम्युनेशन फॅक्टरीने सँडविक एशिया संघाचा ३- १ गोलने पराभव करुन अंतीम फेरी गाठली होती.

