अमरनाथ यात्रेला यंदा 3 जुलैपासून होणार सुरुवात !

जम्मू : भारतातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला यंदा 3 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यासाठी नाव नोंदणी प्रक्रिया 14 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे .यावर्षी ही यात्रा सुमारे 52 दिवस चालणार आहे या यात्रेसाठी कोणताही घातपात होऊ नये म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे.

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्री अमरनाथ बोर्डाच्या 48 व्या बैठकीत यावर्षीच्या अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदाही यात्रा अनंत नाग जिल्ह्यातील पहेलगाम मार्ग आणि गदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गावरून एकाच वेळी सुरू होईल. भक्तांची अपेक्षित गर्दी लक्षात घेता मंडळाने यावर्षी व्यवस्था आणि सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. संपूर्ण भारतातील 540 हून अधिक अधिकृत बँक शाखा मध्ये वेबसाईट किंवा ऑफलाईन नाव नोंदणी सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे .अमरनाथ यात्रेसाठी 13 ते 70 वयोगटातील भावीक नोंदणी करू शकतात यामध्ये सहा आठवडे किंवा त्याहून अधिक गर्भवती महिला, आजारी वयोवृद्ध भाविकांना यात्रेसाठी प्रवास करण्याची परवानगी नाही अमरनाथ बोर्डाने जाहीर केले आहे.