फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्ती, उत्साहाबरोबर सतर्कता,खबरदारी महत्वाची!

गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्ती, उत्साहाबरोबर सतर्कता,खबरदारी महत्वाची!

 डीजे मुळे अत्यंत दुर्दैवी व प्राणघातक दुर्घटना; दोघे गंभीर जखमी
 पिंपरी : गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रामनगर दत्तनगर विद्यानगरच्या सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका जात असताना शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी अत्यंत दुर्दैवी व प्राणघातक दुर्घटना घडली. सर्व मिरवणुका मोठमोठे डीजे लावून काढण्यात आल्या होत्या. मोहननगर मधील मनपा शाळा रस्त्यावरील ट्रान्सफॉर्मरला डीजेचा काही भाग चिकटल्यामुळे डीजे वर असणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना विजेचा जबरी शॉक लागून हे कार्यकर्ते वरून खाली पडुन गंभीर जखमी झाले. जखमी कार्यकर्त्यांना निरामय हॉस्पिटमध्ये या कार्यकर्त्यांना कसेबसे उपचारासाठी नेण्यात आले. सुदैवाने त्यांची परिस्थिती गंभीर आहे मात्र जीव वाचला आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे यावर्षी अनेक इच्छुक उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांना घरपोच चांगल्या देणग्या दिल्या आहेत. सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारी देखील झालेल्या आहेत. यावर्षी सगळेच जोरात आहेत.

आज पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण राज्याच्या सर्व सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात भक्ती भावाने व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न होणार आहेत. या मिरवणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी कुठेही या विसर्जन मिरवणुकांमध्ये गालबोट लागेल, अपघात होईल, कोणाच्या प्राणाला धोका निर्माण होईल याबाबत खबरदारी घेत,सतर्क रहात आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे आवाहन सामाजीक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.

मंडळाची आडवा आडवी व जिरवा जिरवीच्या भानगडीत न पडता एकमेकांच्या आदर करून, समंजसपणे रस्ता करून देणे, व्यसन न करणे, नाचण्यावरून लहान मोठा वाद झाला असेल तर तो सामंजस्याने मिटवणे, ज्या मार्गावरून मिरवणुका जाणार आहेत त्या ठिकाणचे ट्रांसफार्मर ,वीज वाहिन्या याबाबत खबरदारी घेणे, डीजेवर ट्रॅक्टवर उभे राहून डान्स न करण्याबाबत खबरदारी घेणे, मिरवणुकांमध्ये असणाऱ्या वाहनांमुळे अपघात होणार नाही याची खबरदारी घेणे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे, बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवणे, अळी विनंती भापकर यांनी केली आहे.

सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या सर्व खबरदार्या व सतर्कता बाळगुन कालच्या दुर्दैवी अपघाताप्रमाणे कुठलीही घटना घडू नये याची जातीने काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"