ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी दहा गडी राखून विजयी!

“पिंपरी चिंचवड करंडक” क्रिकेट स्पर्धां …
पिंपरी: “पिंपरी चिंचवड करंडक” १९ वर्षाखालील मुलींच्या २५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धांच्या तिसऱ्या दिवशी ऑल स्टार्स क्रिकेट अकॅडमीच्या अनन्या दर्शलेने उत्कृष्ट गोलंदाजी करत चंद्रस क्रिकेट अकॅडमीचे ८ धावात ५ बळी घेत आपल्या क्रिकेट अकॅडमीला विजयी केले. या सामन्यात अनन्या दर्शले सामनावीर झाली.
पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या, फोर स्टार क्रिकेट मैदान हिंजवडी येथे या स्पर्धा सुरू आहेत.
परंदवाल गर्ल्स ५ गडी राखून विजयी
१) क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध परंदवाल गर्ल्स या झालेल्या सामन्यांमध्ये परंदवाल गर्ल्स ५ गडी राखून विजयी झाले.
प्रथम फलंदाजी करताना क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमीने २५ षटके ४ बाद १२४ धावा केल्या. क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी २५ षटके ४ बाद १२४ धावा:-अर्णवी शिंदे १५,हांडे गायत्री १९,प्रज्ञा खंडाळीकर १७,मेघना मोळे १८/१, व्हीएसएम २३/१, एसके २४/२.
त्यांच्या आव्हानास प्रतिउत्तरा दाखल परंदवाल गर्ल्सने १८.२ षटके ५ बाद १२५ धावा केल्या. समीक्षा जमदाडे ३२, व्हीएसएम ४४, प्रज्ञा खंडाळीकर २२/२, ओवी काटे २७/१. परंदवाल गर्ल्स ५ गडी राखून विजयी झाले ,या सामन्यात व्हीएसएम हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात
ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी दहा गडी राखून विजयी
२) चंद्रस क्रिकेट अकॅडमी विरुद्ध ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी या झालेल्या सामन्यांमध्ये ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी दहा गडी राखून विजयी झाली.
प्रथम फलंदाजी करताना चंद्रस क्रिकेट अकॅडमीने २४.५ षटके सर्वबाद ७६ धावा केल्या. प्रिया यादव १७,स्वस्ती काळभोर १५, अनन्या दर्शले ८/५, वैदेही डेरे १४/२,शर्वरी खिलारी २०/२,रश्मी जगदाळे १७/१.
उत्तरा दाखल ऑल स्टार क्रिकेट अकॅडमीने ७.४ षटके बिनबाद ७८ धावा करून हा सामना जिंकला. एमएनएम ४३,अक्षरा डी १९

या सामन्यात ऑल स्टार क्रिकेट अकॅडमीच्या अनन्या दर्शलेने उत्कृष्ट गोलंदाजी करत ८ धावात ५ बळी घेत चंद्रस क्रिकेट अकॅडमीचा धावफलक फक्त ७६ धावांमध्ये रोखला. दुसऱ्या बाजूने प्रत्येकी दोन बळी घेत वैदेही डेरे व शर्वरी खिलारीने तिला गोलंदाजीत चांगलीच साथ दिली. तर एमएनएम व अक्षरा डी यां सलामीच्या जोडीने उत्कृष्ट फलंदाजी केली. ऑल स्टार्स १० गडी राखून विजयी झाली.या सामन्यात अनन्या दर्शले सामनावीर झाली.