फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
पिंपरी-चिंचवड

नदी सुधार प्रकल्पाबाबत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे: उपमुख्यमंत्री पवार

नदी सुधार प्रकल्पाबाबत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे: उपमुख्यमंत्री पवार

शहरातील मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांबाबत बैठक
पिंपरी : पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. हा प्रकल्प राबवत असताना मुळा व मुठा नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टिने उपाययोजना राबवाव्यात, सर्व विभागांनी यापूर्वीसारखेच समन्वय ठेवून काम करावेत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

avratra 8
avratra 8

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांबाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जलसंपदा विभाग, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) अशा नदी सुधार प्रकल्पासंबंधित सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला,पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता दिनकर गोजारे, वन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, डॉ. हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता दि. म. डूबल, सीएमईचे कर्नल प्रभात सिंग, जलविज्ञान तज्ज्ञ अविनाश सर्वे, केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राचे संचालक श्री शैलम, शास्त्रज्ञ अनिलकुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संगणकीय सादरीकरणाद्वारे मुळा नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण बैठकीमध्ये करण्यात आले. हा आराखडा राबवताना जलसंपदा विभागाच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले, बदलते वातावरण, नद्यांना येणारा पूर, नदीपात्राची रुंदी, घाटमाथ्यावर आणि शहर परिसरात पडणाऱ्या पावसाची आकडेवारी, अशा सर्व बाबी विचारात घेऊन भविष्यातील परिस्थितीच्या दृष्टीने प्रकल्पाची आखणी करावी. जैवविविधता, पर्यावरण समतोल आणि वाढते नागरीकरण याची सांगड घालून सर्वसमावेशक नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी दोन्ही महापालिका समन्वयाने काम करीत आहेत. त्यांनी समन्वय प्रकल्प पुर्णत्वास जाईपर्यंत कायम ठेवावा, असेही ते म्हणाले. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही तसेच कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"