Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

अनधिकृतपणे रहात असलेला अफगाण विद्यार्थी ताब्यात!

अनधिकृतपणे रहात असलेला अफगाण विद्यार्थी ताब्यात!

दहशतवाद विरोधी शाखा, परदेशी नागरिक नोंदणी विभागाची कारवाई
पिंपरी : निवासी परवान्याची मुदत संपल्यानंतरही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याला दहशतवाद विरोधी शाखा (एटीबी) आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग (एसआरओ) यांनी ताब्यात घेतले. बावधन येथे सोमवार 28 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्याला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

दाण्यार हुसेन (वय 26, मूळ- अफगाणिस्तान) असे ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बावधन येथील पेबल्स अरवेनिया सोसायटी, सिद्धार्थ नगर परिसरात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अनधिकृत पणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध सध्या सुरू आहे. दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या माहितीनुसार हुसेन हा बावधन परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्यानुसार दहशतवाद विरोधी शाखा आणि परदेशी नागरिक नोंदणी विभाग यांच्या पथकाने त्याच्या निवासस्थानी जाऊन पडताळणी केली.

indra dairy
indra dairy

हुसेन हा शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालयात एम. ए अर्थशास्त्रच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. मात्र जानेवारी 2026 पासून तो महाविद्यालयात गैरहजर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्याकडील पासपोर्ट आणि विद्यार्थी व्हिसाची तपासणी केली असता पासपोर्टची मुदत 26 जून 2027 पर्यंत होती. मात्र भारतात वास्तव्यासाठी असलेल्या त्याच्या निवासी परवान्याची मुदत 31 जानेवारी 2026 रोजी संपली होती. त्यानंतर मुदतवाढ न घेता तो भारतात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. परदेशी नागरिक नोंदणी विभागामार्फत त्याला अफगाणिस्तानला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"